जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:10 PM2018-11-28T22:10:12+5:302018-11-28T22:10:51+5:30

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

Jivandayini Nirgunde reached the bottom | जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाईचे पुन्हा संकट : नवरगाव धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा

म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या नवरगावच्या धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
शहराची लोकसंख्या जवळपास ८० ते ९० हजरांच्यावर असून निर्गुडा नदीद्वारेच नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडण्याची योजना १९५८ पासून सुरू झाली. तेव्हा १५ ते २० हजार लोकांसाठी ही योजना कार्यान्वीत होती. मात्र आता शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या वेकोलिच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून वणीत पाणी पुरवठा सुरू होता. नगरपरिषदेने मागीलवर्षी ५.९५ दलघमी पाणी आरक्षित केले.
जिल्हाधिकाºयांनी या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी दिले. धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे महिन्यातून दोनवेळा पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर राजूर पीठने शहराला चांगला आधार देऊन २० ते २५ ट्युबवेलमार्फत शहराची कशीबशी तहान भागविली. मागीलवर्षी १५ कोटी रूपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना आणली. मात्र जुलै महिन्यात या नदीला मोठा पूर आल्याने नदीवरचे तीन पंप वाहून गेले. त्यामुळे वणीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. सध्या नगरपरिषदेने ४.०० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. २.०० दलघमी पाणी वर्धा नदीतून घेतले आहे. नवरगाव धरणात सध्या ८.५७ दलघमी पाणीसाठा असून ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नवरगाववरून या नदीत ००.१८ दलघमी पाणी सोडले असून ते गुरूवारी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
कोळसा खाणीमुळे बावनमोडी नाला पडला कोरडा
गावाजवळून बारामाही वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यातील जलसाठा आटल्याने गावातील नळयोजना प्रभावित झाली आहे. या नाल्याचा उगमस्थान राजूर येथे आहे. मात्र कोळसा खाणीमुळे सध्या पाण्याचा प्रवाह बंद पडला आहे. परिणामी गावकऱ्यांना ऐन हिवाळ्यातच पाणीसाठी भटकंती करावी लागत आहे. बावनमोडी नाल्याच्यालगत राजूर येथील विटभट्टी असून नाल्यावर इंजिन लावून विटाभट्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या नाल्याचे खोलिकरण व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Jivandayini Nirgunde reached the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी