‘जेडीआयईटी’त राष्ट्रीय परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात
By admin | Published: March 11, 2017 12:58 AM2017-03-11T00:58:24+5:302017-03-11T00:58:24+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात पार पडली.
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिषद ‘स्फिलाटा-१७’ उत्साहात पार पडली. उद्घाटनप्रसंगी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, प्राचार्य उज्ज्वला मालवे, प्रा. भंडारे, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, प्रा. गणेश काकड, ‘स्फिलाटा-१७’चे समन्वयक प्रा. अजय राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी सागर साळुंके, श्याम राठोड आदी होते.
माँ सरस्वती व स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. स्मरणिका ‘टेक्सोरा-१७’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले.
टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर गारमेंट डिझाईनिंग, अॅसेसरिज डिझाईनिंग, रिअल मॉडेल ड्रेपिंग, फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशन, पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत देशभरातील विविध महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्वत: डिझाईनिंग केलेले आणि स्पर्धेसाठी खास बनविलेल्या पोषाखात विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगावच्या डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयाची सायली कोली या दिव्यांग विद्यार्थिनीने फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशन स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रा. स्वप्ना जवादे, प्रा. रेणुका मुळे, प्रा. शीतल वनकर, प्रा. सुरज पाटील, मीनल जयस्वाल, प्रा. राम सावंत, प्रा. शीतल वनकर यांनी परीक्षक म्हणून काम सांभाळले.
गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शिवाजी कॉलेज अकोलाचे ज्ञानेश्वर गावंडे, राजकुमार जिवतानी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कोल्हापूरचे रितु चौधरी, श्रेयश देसाई यांनी द्वितीय, लातूरच्या महिला तंत्रनिकेतनची अश्विनी गौड हिने तृतीय बक्षीस पटकाविले. औरंगाबादच्या अमृता आंबेकर, प्रियंका थेटे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. अॅसेसरिज डिझाईनिंगमध्ये येथील महिला तंत्रनिकेतनच्या उम्मे सलमा बोहरा व श्वेता हातगावकर यांनी प्रथम, कोल्हपूरच्या निधी जैन हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुशांत सावंत (मुंबई), व्यंकटबाबू विग्नन (गुंटूर, आंध्रप्रदेश), बरखा शेंडे (वर्धा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, तर इचलकरंजीचा शिधेस यादव प्रोत्साहनपर बक्षिसाचा मानकरी ठरला. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये अमित देसाई कुलदीप चव्हाण (इचलकरंजी) प्रथम, रोहितकुमार गिरासे, राहुल गिरासे (शिरपूर, धुळे) यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. रिअल मॉडेल ड्रेपिंगमध्ये प्रथम साक्षी यादव व प्रांजली कवाडे (यवतमाळ), द्वितीय क्रमांक खुशबू जैन, निधी अंजीकर, श्रेया बागडे (यवतमाळ) यांना मिळाला. फॅशन स्केचिंग अँड इल्युस्ट्रेशनमध्ये कुलदीप चव्हाण (इचलकरंजी) प्रथम, आकाश कामडे (जेडीआयईटी यवतमाळ) द्वितीय आला. सायली कोली हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर व टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांच्या हस्ते झाले. संचालन अंकित डेरे यांनी तर, प्रा. अजय राठोड यांनी आभार मानले. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक मॅग सॉल्विस कोर्इंबतूर, एटीई एंटरप्रायजेस मुंबई, केतन हुंडाई, क्लब फॉक्स, कॉलेज कट्टा, शो आॅफ, रेडिअँट अकॅडमी, बॉडीलाईन लेडीज फिटनेस सेंटर, नाईस, फॅशन टेम्पल यवतमाळ हे आहेत. आयोजनाबद्दल अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी कौतुक केले. स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)