‘जोश-२०१६’ : पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात
By admin | Published: January 9, 2016 02:51 AM2016-01-09T02:51:58+5:302016-01-09T02:51:58+5:30
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश-२०१६’ अंतर्गत पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
सखी मंच : ‘जरा नच के दिखा’ कार्यक्रमाने धमाल
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश-२०१६’ अंतर्गत पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सखींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घेतला. पहिल्या दिवशीचे आकर्षण ठरले ते ‘जरा नच के दिखा’ हा कार्यक्रम.
येथील दर्डा मातोश्री सभागृहात कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनेने झाली. सखी मंचची प्रार्थना विद्या बेहरे यांनी सादर केली. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सर्वप्रथम ‘भूली बिसरी यादे’ ही गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक उज्वला नारिंगे, व्दितीय क्रमांक स्वप्नाली चौधरी, तृतीय सरला चिद्दरवार आणि चौथा क्रमांक नेहा वर्मा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून लिना कळसपुरकर, दिपीका गंगमवार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत राखी खत्री आणि सुनीता भोयर यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
रांगोळी स्पर्धेत सखींनी एकापेक्षा एक रांगोळ््या साकारल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपाली झोपाटे, व्दितीय भारतीय तुमसरे आणि तृतीय क्रमांक दीप्ती गव्हाणे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून अश्विनी चौलवार, शिवाणी पालडीवाल यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माणिक भोयर, स्मिता नागदिवे यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘जरा चख कर देखो’ या मटरचे नमकीन व्यंजन तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक दिपा तम्मेवार, व्दितीय क्रमांक ज्योती गोल्हर, तृतीय क्रमांक सुनंदा राजगुरे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून सुमन वर्मा, प्रेरणा बाजोरिया यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत दीपा लिंगावार, कविता लढ्ढ यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘ओटी सजाओ’ स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता लढ्ढा, व्दितीय क्रमांक राजश्री झाडोले यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून निता भुतडा आणि उषा मोर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत जयश्री तांबोळी, नीलिमा शर्मा यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
‘मोबाईल संस्कृतीचा मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावरील भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया राठी, व्दितीय उज्ज्वला नारिंगे, तृतीय क्रमांक मंदा बनकर यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून कविता तातेड, माला टाके यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत शुभदा हातगावकर, स्मिता गंधे यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘जैसा देश वैसा भेस’ या थिमवर आधारित वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना मांगुळकर यांनी, व्दितीय विद्या गोहोकार, तृतीय क्रमांक उज्वला नारिंगे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून मनीषा पालतेवार, शालिनी राठी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत पुष्पा पारसकर, नलिनी हांडे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार गीफ्ट स्वरूपात लोकमत सखी मंचच्या जिल्हा
प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांचे स्वागत छाया राठोड यांनी केले. या कार्यक्रमासाठी अलका राऊत, निलिमा मंत्री यांनी सहकार्य केले.
(उपक्रम प्रतिनिधी)