पत्रकारांचा कौटुंबिक स्रेहमिलन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:04 PM2018-01-09T21:04:51+5:302018-01-09T21:05:13+5:30
जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी महेश भवन येथे पत्रकारांच्या परिवारांसाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी महेश भवन येथे पत्रकारांच्या परिवारांसाठी कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला आणि मुलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार न. मा. जोशी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसणकर, शिवसेनेचे शहर प्रमुख पराग पिंगळे, राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को आॅपरेटिव्ह पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक क्षितीज तायडे, शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शहा, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन भागवते, सचिव अमोल शिंदे, जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे मंचावर उपस्थित होते.
पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. या प्रश्नमंजुषेचे संचलन नितीन भागवते यांनी केले. याप्रसंगी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न. मा. जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून सध्याच्या परिस्थितीत पत्रकारीतेची आवश्यकता आणि पत्रकारांना काम करण्यासाठी परिवारातील सदस्यांकडून मिळणारी मोलाची साथ यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला पत्रकार आरती गंधे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पुरी यांनी, तर आभार भास्कर मेहरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता श्रमीक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.