उमरखेड येथे पत्रकारांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:29 PM2018-04-10T23:29:52+5:302018-04-10T23:29:52+5:30
पत्रकारावर हल्ला करून उलट त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या वनरक्षक व दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी उमरखेड येथील पत्रकारांनी....
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पत्रकारावर हल्ला करून उलट त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या वनरक्षक व दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी उमरखेड येथील पत्रकारांनी मंगळवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. एसडीओंना निवेदन देण्यात आले.
उमरखेड येथील वनपाल पेटेकर यांनी पत्रकार देवानंद पुजारी यांना त्यांच्या कार्यालयात बोलाविले. त्या ठिकाणी वनरक्षक भोरगे यांनी पुजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर या प्रकरणी उमरखेड ठाण्यात खंडणी मागितल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही कोणतीही शहनिशा न करता तडकाफडकी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. पत्रकारांना हा वेठीस धरण्याचा प्रकार असून या विरोधात मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दैनिक वृत्तपत्र, वार्ताहर संघ, तालुका पत्रकार संघ, साप्ताहिक पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ग्रुप यांच्यासह ढाणकी, मुळावा, महागाव, पोफाळी, बिजोरा, मोहदी, मुडाणा येथील पत्रकार सहभागी झाले होते. स्थानिक गांधी चौकातून काळ्याफिती लावून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकºयांनी निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार भगवान कांबळे यांना दिले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनाही निवेदन दिले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ एप्रिल रोजी उमरखेड येथे येत असून या प्रकरणी पत्रकारांचे शिस्टमंडळ त्यांना भेटणार आहे.