न्यायाधीश, वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By admin | Published: April 15, 2017 12:15 AM2017-04-15T00:15:36+5:302017-04-15T00:15:36+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Judge, lawyer, employees' blood donation | न्यायाधीश, वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

न्यायाधीश, वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान

Next

न्यायालयात आयोजन : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
यवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्याने जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. न्यायाधीशांसह वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना आणि एकनील रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने न्यायालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखडे होते. न्या. ए.एस. वाघमारे, न्या.पी.एस. खुने, न्या.मोहम्मद मोहिउद्दीन, न्या.पी.ए. वाघमारे, न्या. गरिमा बगरोदिया, विधीसेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव सचिन अग्रवाल, वकील संघाचे अध्यक्ष राजेन्द्र धात्रक, एकनील ब्लड बँकेचे व्यवस्थापक सागर तोडक, समुपदेशक आर. एन. पुरी उपस्थित होते.
यावेळी न्या. अरविंद वानखडे म्हणाले, जिल्ह्यात दरवर्षी २२ हजार नागरिकांना रक्ताची आवश्यकता भासते. प्रत्यक्षात १६ हजार नागरिकांना रक्त उपलब्ध होते. जवळपास तीन ते चार हजार रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत संघटनेने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकनील ब्लड बँकेचे व्यवस्थापक सागर तोडक यांनी रक्ताची आवश्यकता सांगितली. संचालन प्रवीण राऊत, आभार बळीराम बेतवार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यवतमाळ न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष जावेद अली, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष जी.एल. जाधव, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर जाधव, तृतीयश्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत देशमुख, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे उपसचिव महंमद शफीक शेख आदींनी पुढाकार घेतला. (शहर वार्ताहर)

लॉयर्स असोसिएशनचा अभिवादन कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब लॉयर्स असोसिएशनतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखडे होते. न्या.ए.एस. वाघमारे, न्या.पी.एस. खुने, न्या.मोहम्मद मोहिउद्दीन, न्या. पी.ए. वाघमारे, न्या.गरिमा बगरोदिया, विधीसेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव न्या. सचिन अग्रवाल, वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक, लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा दिंडीलता कांबळे, अ‍ॅड. प्रगती वाणी, अ‍ॅड रवींद्र अलोणे, अ‍ॅड. राहुल घरडे, अ‍ॅड. योगीता ढोमणे, अ‍ॅड. सविता ढोक, अ‍ॅड. जयंत ठाकरे, अ‍ॅड. बिपीन ठाकरे, अ‍ॅड. इंगोले, अ‍ॅड आठवले, अ‍ॅड.मानकर, उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. रवींद्र अलोने यांनी तर आभार अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनी मानले.
 

Web Title: Judge, lawyer, employees' blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.