पुसदमध्ये न्यायाधीश, वकिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:39+5:302021-07-23T04:25:39+5:30
पुसद : गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या वतीने गुरुवारी न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश ...
पुसद : गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या वतीने गुरुवारी न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांचा सन्मान करण्यात आला.
न्यायव्यवस्थेमुळे देशात आणि जगात शांतता आणि समता अबाधित आहे. न्यायव्यवस्था ही सर्व सामान्यांसाठी आहे, ही भावना यानिमित्ताने दृढ व्हावी, याअनुषंगाने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुलकर्णी, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश फड, दिवाणी न्यायाधीश खान, न्यायाधीश व्यास, न्यायाधीश मारगोडे, न्यायाधीश सोनटक्के, न्यायाधीश फुलारी, न्यायाधीश पवार, न्यायाधीश वाघमोडे, न्यायाधीश साठे यांचा सत्कार करण्यात आला. न्यायाधीश व वकील संविधानिक तत्त्वाचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला गोदावरी अर्बनचे ॲड. महेश पाठक, शाखा व्यवस्थापक भारतकुमार राठोड, सहायक व्यवस्थापक सुमित देवरे, अधिकारी महेश बोरकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.