मोफत अन्नधान्य वाटपावर न्यायाधीशांचाही ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:00 AM2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:20+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या आदेशानुसार या भेटी देण्यात आल्या. यावेळी न्या. एम.आर.ए. शेख यांच्यासोबत तहसीलदार कुणाल झाल्टे, मंडळ अधिकारी वसंत पखाले, लक्ष्मीकांत देशपांडे, पुरवठा निरीक्षक संतोष डोंगरे आदी उपस्थित होते. बुधवारी दुपारी समाज कल्याणचे शासकीय मुलींचे वसतिगृह येथे भेट देण्यात आली.

Judges 'Watch' on Free Food Distribution | मोफत अन्नधान्य वाटपावर न्यायाधीशांचाही ‘वॉच’

मोफत अन्नधान्य वाटपावर न्यायाधीशांचाही ‘वॉच’

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष पाहणी : मजूर, कर्मचाऱ्यांशी साधला संवा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संचारबंदीत अडकलेल्या मजुरांसाठी निवारागृह उभारुन शासनातर्फे मोफत अन्नधान्य व तयार जेवण वाटप केले जात आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आता न्यायाधीश मैदानात उतरले आहे. बुधवारी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए. शेख यांनी अनेक ठिकाणी भेट दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या आदेशानुसार या भेटी देण्यात आल्या. यावेळी न्या. एम.आर.ए. शेख यांच्यासोबत तहसीलदार कुणाल झाल्टे, मंडळ अधिकारी वसंत पखाले, लक्ष्मीकांत देशपांडे, पुरवठा निरीक्षक संतोष डोंगरे आदी उपस्थित होते. बुधवारी दुपारी समाज कल्याणचे शासकीय मुलींचे वसतिगृह येथे भेट देण्यात आली. तेथे स्थलांतरित व बेघर कामगारांसाठी ५० ते ६० बेडची व्यवस्था आहे. सुरक्षा रक्षक म्हणून नलू मसराम, नीलेश अगलदरे, सुधीर चहांदे उपस्थित होते. स्वच्छताही उत्तम असल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात येथे भेट दिली. तेथे निरीक्षण अधिकारी चांदणी शिवरकर यांनी शासनाकडून भरपूर अन्नधान्य पुरविण्यात आल्याची माहिती दिली. बोदड येथील संध्याताई सव्वालाखे डीएड महाविद्यालयाला भेट देण्यात आली. तेथे राहणाºया कामगारांनी अन्नधान्य भरपूर मिळत असल्याचे सांगितले. परंतु आपल्याला कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातील आपल्या स्वगावी जायचे असल्याबाबत त्यांनी विनंती केली. मात्र ३ मेपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे सध्या आपण येथेच रहावे असे यावेळी त्यांना समजावून सांगण्यात आले. या सोबतच समर्थ महिला बचत गट, सरकारी स्वस्त धान्य दुकान तारपुरा, आठवडी बाजार येथे भेटी देण्यात आल्या. गरजू लोकांसाठी आलेले धान्य आणि वाटप केलेले धान्य याचा आढावा घेण्यात आला. बळीराजा चेतना भवनातील नागरी सुविधा कक्षालाही न्यायाधीशांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तहसीलदार संतोष डोईफोडे, नायब तहसीलदार अजय गौरकार तसेच इतर अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

तालुका न्यायालयाकडूनही आढावा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए. शेख यांनी जिल्ह्यातील तालुका न्यायालय येथील तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षांनासुद्धा अशाच प्रकारे मोफत अन्नधान्याबाबत शहानिशा करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे बºयाच तालुका न्यायालयातील तालुका विधीसेवा समित्यांनी आवश्यक त्या ठिकाणी भेटीही दिलेल्या आहेत.

Web Title: Judges 'Watch' on Free Food Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.