यवतमाळमध्ये स्वर-सुरांची जुगलबंदी; पं. विश्वमोहन भट्ट यांचे वादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:36 PM2019-11-25T12:36:48+5:302019-11-25T12:38:10+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे रविवारी सायंकाळी ‘स्वरांजली’ कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे रविवारी सायंकाळी ‘स्वरांजली’ कार्यक्रम पार पडला. यावेळी पद्मभूषण तथा ग्रॅमी अवॉर्ड विजेते पंडित विश्व मोहन भट्ट यांचे ‘मोहन वीणा’ वादन रंगले. तर राजस्थानी गायक उस्ताद अनवर खान मंगणियार यांनी राजस्थानी लोकगीते तसेच सुफी रचना पेश केल्या. स्वर आणि सुरांची ही जुगलबंदी ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ अशा नावाने जगभर गाजल्यानंतर रविवारी यवतमाळातही रंगली. या कार्यक्रमासाठी यवतमाळकर रसिकांनी ‘प्रेरणास्थळा’वर भरगच्च गर्दी केली होती.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पंडित विश्व मोहन भट्ट, पंडित वस्ताद अनवर खान, खडकताल वादक कुटले खान, पंडित सलील भट्ट, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमत एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमत सखी मंच यवतमाळ जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, लव किशोर दर्डा, सोनाली लव दर्डा, शिवान देवेंद्र दर्डा आदींची उपस्थिती होती.