खदानीत बुडून कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:38+5:302021-07-13T04:09:38+5:30

महागाव तालुक्यातील बिजोरा येथिल हृदयद्रावक फोटो बिजोरा : शेतालगतच्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या युवा कनिष्ठ सहाय्यकाचा पाण्यात बुडून मृत्यू ...

Junior assistant drowns in mine | खदानीत बुडून कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

खदानीत बुडून कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

Next

महागाव तालुक्यातील बिजोरा येथिल हृदयद्रावक

फोटो

बिजोरा : शेतालगतच्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या युवा कनिष्ठ सहाय्यकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान महागाव तालुक्यातील बिजोरा येथे घडली.

उल्हास खोब्राजी मानतुटे (३५), असे मृताचे नाव आहे. उल्हास जिल्हा परिषद बांधकाम विभागात पुसद येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. रविवारी सुट्टी असल्यामुळे ते गावी आले. ते मेव्हण्याच्या शेतात गेले असता लगतच्या खदानीत मुले पोहताना दिसली. उल्हासलाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बिट जमादार शरद येडतकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. उल्हास मानतुटे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.

120721\1433-img-20210712-wa0013.jpg

खदानीमध्ये बुडून कनिष्ठ सहाय्यका मृत्यु

महागाव तालुक्यातील बिजोरा येथिल हृदयद्रावक

Web Title: Junior assistant drowns in mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.