गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:05 PM2019-07-18T22:05:47+5:302019-07-18T22:06:02+5:30
ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले.
सर्वप्रथम प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरद कळणावत यांच्या घरी हा सोहळा साजरा झाला. पादप्रक्षालन व औक्षण करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र देत सन्मानित केले. संगीत विधेच्या कलावंतांनी संस्कार भारती ध्येय गीत म्हटले. विभाग प्रमुख डॉ. ताराचंद कंठाळे यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. यानंतर बाजोरियानगर येथील ज्येष्ठ चित्रकार-मूर्तीकार महंमद शेख यांचा सपत्नीक गौरव केला. येथे प्रांत सहमंत्री विवेक कवठेकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. विजय इंगोले यांनी शेख पेंटर यांच्या कार्याची माहिती दिली. बांगरनगर येथील ज्येष्ठ धावपटू वीणा मोहतुरे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर सावने यांनी परिचय करून दिला. नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अनिल पटेल यांचा वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार यांनी डॉ. पटेल यांच्या कार्याची ओळख करून दिली. दत्तात्रय देशपांडे यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली. सुजित राय, भक्ती जोशी, जीवन कडू यांनी संचालन व आभाराची जबाबदारी पार पाडली. संपूर्ण सोहळ्यास प्रा.डॉ. माणिक मेहरे, राजश्री कुलकर्णी, प्रा.डॉ. स्वाती जोशी, आनंद कसंबे, प्राची बनगीनवार, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, डॉ. नेहा चिंतावार, सुरेश राठी, अनंत कौलगीकर, वसंत उपगनलावार, सुशील बत्तलवार, डॉ. गौरव पटेल, आशीष सरूरकर, अरुण लोणारकर, संजय सांबजवार, अपर्णा शेलार, निशिकांत थेटे, प्रिया कांडुरवार, सतीश अवधूत, श्रीदीप इंगोले आदी उपस्थित होते.