जरा हटके! यवतमाळ जिल्ह्यात निराधार बांधवांना दिला चहा व नाश्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:25 AM2020-03-22T11:25:24+5:302020-03-22T12:07:20+5:30
जनता कर्फ्युमध्ये सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका असा आदेश असतानाही, एका मुस्लीम युवकाने घरासमोरच्या निराधार बांधवांना चहा व नाश्ता पुरवून माणुसकीचा परिचय करून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुकेश इंगोले
यवतमाळ: जनता कर्फ्युमध्ये सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडू नका असा आदेश असतानाही, एका मुस्लीम युवकाने घरासमोरच्या निराधार बांधवांना चहा व नाश्ता पुरवून माणुसकीचा परिचय करून दिला.
दारव्हा या यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गोळीबार चौकात बिलालशहा नजीरशहा हा मुस्लीम युवक राहतो. रविवार सकाळपासून घरातच थांबण्याचे आदेश असल्यामुळे तो घरीच होता. मात्र घरासमोरच्या चौकात नेहमी बसलेले निराधार बांधव आज दिवसभर उपाशी राहतील हे लक्षात आल्याने तो अस्वस्थ झाला. त्याने तात्काळ घरी नाश्ता व चहा बनवून त्यांना अवघ्या काही मिनिटांसाठी बाहेर पडून तो पोहचता केला.