सरपंचांच्या आरक्षण सोडतीने ‘कही खुशी कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:22+5:30
गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी महिला आरक्षणाची सोडत होणार आहे. याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी महिला आरक्षणाची सोडत होणार आहे. याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष आहे.
यवतमाळ तालुक्यात असे आहे आरक्षण
अनुसूचित जाती : बेचखेडा, रामवाकडी, वाई रूई, वरझडी, हिवरी, भोयर, दहेली, येवती, गहूली हेटी, वाटखेड, डोर्ली, किन्ही, बोथबोडन, खरद. अनुसूचित जमाती : इचोरी, बोरगाव, सायखेडा बु, कोळंबी, पारवा, येळाबारा, भारी, वाकी रोड, पिंपरी पांढूर्णा, जवळा ई, विठ्ठलवाडी, टेंभूर्णा, येरद, वडगाव, खानगाव, घाटाणा, सालोड, पार्डी नाका, पिंपरी, वरूड, धानोरा वड, बोरीसिंह, वाई हातोला, उमरठा, रूईवाई, झुली, अकोला बाजार. नामाप्र : बोरजई, सावरगड, खैरगाव, बारडतांडा, कापरा मेथड, शिवणी, साकूर, चौधरा, मंगरूळ, बेलोरा, चिंचबर्डी, तळेगाव, वागद, भिसनी, धामणी, आकपूरी, सायखेडा खु, हातगाव, मनपूर, बोरी गोसावी, मुरझडी चिंच, आसोला, मुरझडीलाल, भांबराजा सर्वसाधारण प्रवर्ग : चिंचघाट, धानोरा बोथ, कारेगाव, बारड, गोधणी, घोडखिंडी, चांदापूर, जांब, रातचांदणा, कामठवाडा, हातगाव, मांजर्डा, कार्ली, मडकोना, चापडोह, रामनगर, अर्जूना, लोणी, लासिना, किटा, तिवसा, रोहटेक, म्हसोला.
आरक्षणात सुधारणा
हिवरी, रामवाकडी, डोर्ली, खरद या गावातील सरपंच आरक्षणावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. याचा सुधारणा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविणार असल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर सर्व प्रक्रिया शांततेत झाली.