कलीम काव्यरत्न पुरस्कार देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:45 AM2021-09-26T04:45:49+5:302021-09-26T04:45:49+5:30
आर्णी : मराठी, हिंदी, उर्दू साहित्य क्षेत्रात अनमोल ठसा उमटवून साहित्य क्षेत्राला अचानक पोरके करून निघून जाणारे येथील साहित्यिक ...
आर्णी : मराठी, हिंदी, उर्दू साहित्य क्षेत्रात अनमोल ठसा उमटवून साहित्य क्षेत्राला अचानक पोरके करून निघून जाणारे येथील साहित्यिक कलीम खान यांच्या स्मृती जपण्यासाठी कलीम काव्यरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
साहित्य क्षेत्रातील कलीम खान यांचे अकस्मात निधन झाले. आर्णी येथील शब्दशिल्प साहित्य संघाने कलीम खान यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात म्हणून कलीम काव्यरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रक्कम, असे राहील. यात गजल, काव्य, मुक्तछंद, रुबाईच्या साहित्यिकांना भाग घेता येईल. या साहित्य पुरस्काराकरिता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत शब्दशिल्प साहित्य प्रतिष्ठान, विजय शंकर ढाले, मु.पो. आर्णी (बहिरमनगर) या पत्त्यावर दोन प्रती पाठवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.