पावसामुळे कामनदेवचा संपर्क तुटला
By admin | Published: July 31, 2016 01:13 AM2016-07-31T01:13:22+5:302016-07-31T01:13:22+5:30
कामनदेव ते लासिनाला जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या दुर्तफा बंधारा बांधल्यामुळे हा रस्ता आता पाण्यात बुडाला आहे.
विद्यार्थ्यांची अडचण : मुख्य रस्त्यावरच बंधारा बांधल्यामुळे समस्या
सोनखास : कामनदेव ते लासिनाला जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या दुर्तफा बंधारा बांधल्यामुळे हा रस्ता आता पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे कामनदेव येथील विद्यार्थी व नागरिकांना वारज ते लासिना या रस्त्यावरून जवळपास सात किलोमीटरच्या फेऱ्याने जावे लागत आहे. कामनदेवच्या सरळ मार्गाचा संपर्कच तुटल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
पावसाळ््यातील स्थितीची पूर्व कल्पना आल्याने नागरिकांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही समस्या मांडली होती. तसेच वेळोवेळी इतर विभागांसोबतही पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. परंतु गावकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे यावर्षी होत असलेल्या मुसळधार पावसात हा रस्ता पूर्णपणे बुडाला आहे. या रस्त्याच्या दुन्ही बाजुला बंधारा बांधल्यामुळे आजही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये नागरिकांचे हाल होत आहे. बंधाऱ्याची निर्मिती करताना भविष्यात कुठल्या समस्या निर्माण होऊ शकते, याचा विचारच केला गेला नाही. (वार्ताहर)