पावसाच्या व्यत्ययाने कामठी व नागपूरला संयुक्त विजेतेपद

By admin | Published: March 2, 2015 02:08 AM2015-03-02T02:08:33+5:302015-03-02T02:08:33+5:30

येथील पोस्टल मैदानावर सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत अचानक आलेल्या पावसाने व्यत्यय आला. उपांत्यफेरीचे सामने अशाही स्थितीत घेण्यात आले.

Kamathi and Nagpur joint championship with the interruption of rain | पावसाच्या व्यत्ययाने कामठी व नागपूरला संयुक्त विजेतेपद

पावसाच्या व्यत्ययाने कामठी व नागपूरला संयुक्त विजेतेपद

Next

यवतमाळ : येथील पोस्टल मैदानावर सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत अचानक आलेल्या पावसाने व्यत्यय आला. उपांत्यफेरीचे सामने अशाही स्थितीत घेण्यात आले. मात्र अंतिम सामना जोरदार पावसाने घेणेच शक्य झाले नाही. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचलेल्या कामठी येथील न्यु ग्लोब आणि नागपूरच्या एसआरपीएफ संघांना संयुक्त विजेतेपद प्रदान करण्यात आले.
फ्रेन्डस फुटबॉल असोसिएशनच्यावतीने रमेश यादव आणि संजय देशमुख यांच्या स्मृती २५ फेब्रुवारीपासून येथील पोस्टल मैदानावर अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १८ संघ सहभागी झाले होते. शनिवारी या स्पर्धेचा उपांत्य सामना आयोजित होता. मात्र जोरदार पाऊस झाल्याने हा सामना रविवारी नेहरू स्टेडियमवर घेण्यात आला. परंतु अंतिम सामन्याच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे हा सामना घेणेच शक्य झाले नाही. शेवटी दोन्ही संघांना विजेतेपद देण्यात आले. न्यु ग्लोब कामठी आणि एसआरपीएफ नागपूर संघाला प्रत्येकी २६ हजार रुपये रोख, फिरते चषक लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, मार्गदर्शक हरीहर मिश्रा, फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ राजेश साबळे, रणजीतसिंह बघेल उपस्थित होते.
नगराध्यक्ष सुभाष राय यांनी फे्रन्डस फुटबॉल असोसिएशनच्या आयोजनाचे कौतुक केले. तर अ‍ॅड़ साबळे यांनी संघटनेचा इतिहास व आयोजनाची भूमिका प्रस्ताविकातून सांगितली. यवतमाळ सारख्या मागास भागात खासदार विजय दर्डा यांच्या प्रयत्नातून होणारे नागपूर प्रीमिअर फुटबॉल लिगसारखी स्पर्धा यवमाळात झाल्यास येथील खेळाडू राष्ट्रीयस्तरावर चमकतील अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविणारे माजी राज्य क्रीडा मार्गदर्शक हरीहर मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्राचार्य संतोष गोरे यांनी केले.
(क्रीडा प्रतिनिधी)

शासनाने क्रीडा विकासाबाबत धोरण स्पष्ट करावे - विजय दर्डा
क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासानाने विशेष धोरण राबविण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने क्रीडा धोरण स्पष्ट करावे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. फ्रेन्डस फुटबॉल असोसिएशनच्यावतीने आयोजित राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहात ते बोलत होते. खेळ विकासासाठी खेळाडुंचा आहार, त्यांना अद्यावत प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शकांची नियुक्ती याकडे लक्ष द्यावे विदर्भात फुटबॉलचे सकारात्मक वातावरण आहे. यासाठी नागपूर येथे फुटबॉल अकॅडमीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कामठी शहरात जिगरबाज फुटबॉलपटू आहेत. येथील फुटबॉलपटू स्कील, स्टॅमिना, स्पिरिट भरपूर आहेत. जेवढे फुटबॉल क्लब आहेत तेवढे पश्चिम बंगालमध्ये देखील नाही. या वैशिष्ट्यामुळेच कामठीही फुटबॉलची खऱ्या अर्थाने पंढरी झाली आहे. मुंबई, गोवा, भोपाळ सारख्या बलाढ्य संघावर मात करून विजेतेपद विदर्भातच आल्याचा आनंद दर्डा यांनी व्यक्त केला.

Web Title: Kamathi and Nagpur joint championship with the interruption of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.