कळंबचे सांस्कृतिक भवन अबाधित राहणार

By admin | Published: January 12, 2016 02:20 AM2016-01-12T02:20:47+5:302016-01-12T02:20:47+5:30

नगरपंचायतीचे कामकाज सांस्कृतिक भवनात हलविण्याचा घाट घालण्यात आला होता.

Kambak's cultural building will remain intact | कळंबचे सांस्कृतिक भवन अबाधित राहणार

कळंबचे सांस्कृतिक भवन अबाधित राहणार

Next

एकमताने ठराव : सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी घेतला ‘लोकमत’चा आधार
कळंब : नगरपंचायतीचे कामकाज सांस्कृतिक भवनात हलविण्याचा घाट घालण्यात आला होता. सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर तसा मुद्दा ठेवण्यात आला होता. परंतु ‘लोकमत’ने त्यासंदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्ताचा आधार घेत अनेक नगरसेवकांनी या कारस्थानाला विरोध केला. अखेर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत सांस्कृतिक भवनात नगरपंचायतीचे कामकाज न हलविण्याचा ठराव एकमताने पारीत झाला.
तत्कालीन ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात आली. सांस्कृतिक भवन गरजूंच्या कामी यावे, हा उद्देश मागे पडू नये, अशी नागरिकांची भावना होती. लोकभावनेचा रेटा लक्षात घेता पदाधिकाऱ्यांना सांस्कृतिक भवनात कार्यालय हलविणे शक्य झाले नाही.
येत्या काळात शहरातील अतिक्रमण काढण्याचा ठरावही घेण्यात आला. मुख्याधिकारी एम.एस.व्यवहारे अनेक सभांना उपस्थित राहत नाही. याविषयी बांधकाम सभापती आशीष धोबे यांनी सभेत मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. श्री चिंतामणीचा यात्रा महोत्सव सुरु होत आहे. त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले.
सभेला मुख्याधिकारी एम.एस.व्यवहारे यांच्यासह नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, सभापती आशीष धोबे, सभापती सुनिता डेगमवार, सभापती जयश्री गावंडे, उपसभापती शैलजा उम्रतकर, राजू पड्डा, राजेश मांडवकर, मारोती वानखडे, मारोती दिवे, फारुक सिद्धिकी, सुनंदा आसुटकर, स्मिता नाईक, निखत परवीन गफूर, रिता वाघमारे, राजेंद्र हारगुडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kambak's cultural building will remain intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.