नेरमध्ये किसान सभेचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:27 PM2019-02-26T21:27:34+5:302019-02-26T21:27:47+5:30
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत घंटानाद करण्यात आला. दुष्काळग्रस्तांच्या सोयीसवलती तालुक्यातील नागरिकांना द्या, विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करा, शेतमजुरांना संपूर्ण उन्हाळाभर मनरेगाची कामे द्या, पीककर्ज आणि पीक विमा योजनेच्या वाटपातून खासगी कंपन्यांना हद्दपार करा, शेती पिकाला २४ तास वीज, २०१८ पर्यंत सरसकट कर्जमाफी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी शेतमजूर युनियनचे संजय भालेराव, गुलाब उमरतकर, मनिष इसाळकर, नेर तालुका अध्यक्ष दिलीप महाजन, अरुण भलमे, जमीरबेग मिर्झा, प्रवीण कोठेकर, ऋषिकेश खोब्रागडे, अशोक दाभिरे, बबन कोठेकर, अनिल ढोके, नरेंद्र गोळे, गोरखनाथ सावळे, शंकरराव हजारे, प्रमोद दरोई, विनोद बोचरे, सुभाष खंडारे, दत्ता नेमाळे, सुखदेव मैंद, शब्बीर खाँ पठाण, सुरेश राठोड, प्रशांत शेंडे, राजू बन्सोड, अशोक माने, सुभाष खवले, वासुदेव कावलकर, सुभाष चरडे, अजय आसटकर आदी उपस्थित होते.