मित्रच ठरला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:28+5:30
पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात शेतशिवार हिरवेकंच होते. यामुळे पायाखालची जमीनही दृष्टीस पडत नाही. अशा परिस्थितीत श्वापदांचा वावर वाढतो. पिकांमध्ये बिनधास्त फिरताना सर्पदंशाचा धोकाही वाढतो. दरवर्षी अशा शेकडो घटना घडतात. अलीकडे या घटना वाढत आहेत. जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे पुढे येतात. जिल्ह्यात सात महिन्यात ३३९ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वैैैैैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे.
यामध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सर्पदंशाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे संरक्षण करणारा साप शेतकºयांसाठीच कर्दनकाळ ठरला.
यवतमाळ जिल्हा हा डोंगरांनी वेढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेचे हे सर्वात शेवटचे टोक आहे. सापांना पोषक वातावरण या भागात आहे. यामुळे सापांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या भागात पहायला मिळतात. सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कारण तो शेतशिवारात उंदीर आणि इतर किड्यांना खातो. मात्र त्यावर पाय पडला तर तो शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो.
पूर्वी शेतशिवारात सर्पदंशाच्या घटना क्वचित घडत होत्या. आता सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. याला पीक पद्धती कारणीभूत ठरली आहे. कपाशीला पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची निवड केली. पेरणीनंतर शेतशिवार हिरव्या पिकाने झाकून जाते. त्यात अधिक पाऊस झाला तर संपूर्ण पीक दाटते. यामुळे जमिनीवर बेसावधपणे पाय पडला तर सर्पदंशाचा दाट धोका असतो.
जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. या महिन्यात पीक जोमदार अवस्थेत असतात. पोषक वातावरणाने पीक जोमाने वाढतात. यामुळे जमीन दिसत नाही. फवारणी अथवा निंदण करण्यासाठी गेले तर अशा ठिकाणी दडून असलेला साप बाहेर पडतो. आपला पाय पडल्याने साप स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रतीहल्ला चढवितो. यात शेतकरी, शेतमजूर जखमी होतात.
अनेकवेळा साप चावल्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यापूर्वी मांत्रिकाकडे नेले जाते. काही जागृक शेतकरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना दवाखान्याकडे नेतात. त्या ठिकाणी सर्पदंशावर उपचार केला जातो. यातून ९९ टक्के शेतकरी बरे होतात.
शेतकऱ्यांना रखवालीसाठी अनेकवेळा रात्रीला जावे लागते. रात्री रखवाली करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. तर वीज भारनियमनामुळे रात्रीच्या शेड्यूललाच पाणी येते. अशा परिस्थितीत शेतकरी रात्री शेतशिवारात असतात. या ठिकाणी सर्पदंशाच्या घटनेचा सामना करावा लागतो. यामुळे सर्पदंशाच्या संख्येत वारंवार भर पडत आहे.
दवाखान्यापर्यंत येणारे रुग्ण वाचतात
साप चावल्यानंतर त्याला वैदूकडे न नेता दवाखान्यात आणले तर त्याचा प्राण वाचतो. याकरिता प्रथमोपचारही तत्काळ करता येतात. मात्र डॉक्टरांपर्यंत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पोहोचविले पाहिजे.