काेराेनाने घेतला तिघांचा बळी, ५२ नवे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:00:06+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ३८६ झाली आहे. २४ तासांत ४० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६५२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काेराेनामुळे ३९४ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे.

Kareena took three wickets, 52 new positive | काेराेनाने घेतला तिघांचा बळी, ५२ नवे पाॅझिटिव्ह

काेराेनाने घेतला तिघांचा बळी, ५२ नवे पाॅझिटिव्ह

Next
ठळक मुद्देमृतक पुसद, वणी, कळंब तालुक्यातील

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. मृतकांमध्ये  पुसद येथील ६८ वर्षीय, वणी तालुक्यातील ८०  वर्षीय आणि कळंब तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 
 वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ३८६ झाली आहे. २४ तासांत ४० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६५२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काेराेनामुळे ३९४ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एक लाख २० हजार ५१७ नमुने तपासणीला पाठविले असून, यापैकी  एक लाख १९ हजार ९१९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.  ५९८ अहवाल अप्राप्त आहेत, तसेच एक लाख ७ हजार ५३३  नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: Kareena took three wickets, 52 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.