धक्कादायक ! जनधनची रक्कम काढण्यासाठीच्या रांगेतील महिला दगावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 11:19 PM2020-04-25T23:19:15+5:302020-04-25T23:21:43+5:30

शनिवारी पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.

Karegaon incident: women died who was standing in que to withdraw money of Jandhan pda | धक्कादायक ! जनधनची रक्कम काढण्यासाठीच्या रांगेतील महिला दगावली

धक्कादायक ! जनधनची रक्कम काढण्यासाठीच्या रांगेतील महिला दगावली

Next
ठळक मुद्देभारती अरुण कुंटलवार (३०) असे या महिलेचे नाव आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनधनच्या खात्यात ५०० रुपये वळते करण्यात आले आहे.

रुंझा (यवतमाळ) : जनधनच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी रांगेत असलेली महिला भोवळ येऊन पडल्याने दगावली. ही घटना शुक्रवारी कारेगाव(रामपूर) ता.केळापूर येथे घडली. भारती अरुण कुंटलवार (३०) असे या महिलेचे नाव आहे. शनिवारी उत्तरीय तपासणी करून तिचा मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनधनच्या खात्यात ५०० रुपये वळते करण्यात आले आहे. ही रक्कम काढण्याची सुविधा बँकांसह खासगी मिनी एटीएमवरही आहे. कारेगाव(रामपूर) येथील मिनी एटीएमवर पैसे काढण्यासाठी भारती कुंटलवार ही विवाहिता रांगेत होती. वास्तविक तिची प्रकृती ठीक नव्हती. मात्र पैशांची गरज असल्याने रांगेत लागली होती. भोवळ येऊन पडताच तिला याठिकाणी उपस्थित लोकांनी रूंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. याठिकाणी तिचा मृत्यू झाला. शनिवारी पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेचा तपास पांढरकवडाचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात जमादार फुल्लुके, अविनाश मुंढे करीत आहे.

Web Title: Karegaon incident: women died who was standing in que to withdraw money of Jandhan pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.