कौशिकी चक्रवर्ती यांची आज हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफल

By admin | Published: November 24, 2015 05:46 AM2015-11-24T05:46:18+5:302015-11-24T05:46:18+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८

Kaushiki Chakraborty today's Indian classical singing concert | कौशिकी चक्रवर्ती यांची आज हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफल

कौशिकी चक्रवर्ती यांची आज हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफल

Next

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृती समारोहानिमित्त मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफल आणि बुधवार २५ नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळावर संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबूजींच्या स्मृतीदिन समारोहानिमित्त प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता बाबूजीचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर करण्यात आले आहे. बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी यवतमाळकर रसिकांना संगीताची मेजवाणी असते. यावर्षी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारा आणि अनेक मोठ्या संगीत समारोहातून आपल्या गायिकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कौशिकी चक्रवर्ती यवतमाळकरांना संगीताची मेजवाणी देणार आहे. या मैफलीला संदीप घोष तबल्यावर तर अजय जोगळेकर हार्मोनियमवर साथ देणार आहे.
इनामी काटा कुस्त्यांची दंगल
यवतमाळच्या ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार आहे.

४बाबूजींच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या प्रेरणास्थळावर संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन आणि उर्वरिक राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी नागरी उड्ड्यन मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रतिथयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.

Web Title: Kaushiki Chakraborty today's Indian classical singing concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.