दीड हजार नागरिकांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:13+5:30

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. तालुक्यातील हुडी (बु) येथील एक इसम सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. नंतर त्यांच्या संपर्कातील तेथीलच आणखी तीन, निंबी येथील चार, धुंदी येथील एक, शहरातील गढी वॉर्ड येथील पाच आणि वसंतनगरमधील एक असे १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी एका ६० वर्षीय इसमाचा १४ जून रोजी मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासन हादरून गेले.

A keen eye on one and a half thousand citizens | दीड हजार नागरिकांवर करडी नजर

दीड हजार नागरिकांवर करडी नजर

Next
ठळक मुद्देपुसदमध्ये दररोज तपासणी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात सध्या दोन प्रतिबंधित क्षेत्र आहे. या परिसरातील एक हजार ४७४ नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यांची मोबाईल फिवर क्लिनिकद्वारे दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. तालुक्यातील हुडी (बु) येथील एक इसम सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. नंतर त्यांच्या संपर्कातील तेथीलच आणखी तीन, निंबी येथील चार, धुंदी येथील एक, शहरातील गढी वॉर्ड येथील पाच आणि वसंतनगरमधील एक असे १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी एका ६० वर्षीय इसमाचा १४ जून रोजी मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासन हादरून गेले. सध्या वसंतनगरमधील कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. उर्वरित १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने व त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने सुटी देण्यात आली.
शहरात सध्या गढी वॉर्ड व वसंतनगर हे दोन प्रतिबंधित क्षेत्र आहे. या परिसरात २९६ घरे आहे. त्यात एक हजार ४७४ जणांचे वास्तव्य आहे. या सर्वांवर प्रशासनाची करडी नजर आहे. परिसरातील नागरिकांची दररोज थर्मल गनने व पल्स आॅक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. गढी वॉर्ड परिसरात १२३ घरे व ६५० लोकसंख्या तर वसंतनगर क्षेत्रात १७३ घरे व ८२४ लोकसंख्या आहे.
आयुर्वेद महाविद्यालयातील डीसीएचसी सेंटरचे नोडल आॅफिसर व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरीभाऊ फुपाटे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ.रती वावधने यांच्या नेतृत्वात गढी वॉर्डात चार तर वसंतनगरमध्ये डॉ.विद्या राठोड यांच्या नेतृत्वात चार आशांचे पथक कार्यरत आहे.
ही दोन्ही पथके प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहे. सोबतच मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडणीचे आजार व गरोदर माता आदींची दिवसातून दोनदा तपासणी केली जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात मोबाईल फिवर क्लिनिकद्वारे १९० पैकी १६२ गावांमधील एक हजार ९१० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९९ जणांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी आजार आढळले. त्यांच्यावर गावात उपचार केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.

नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा
तालुका व शहरात तूर्तास कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जावू नये, नियमित हात धुवावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.

Web Title: A keen eye on one and a half thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.