जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:58 PM2019-04-12T20:58:00+5:302019-04-12T20:58:39+5:30

उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

To keep the ST ready for more traffic | जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज ठेवणार

जादा वाहतुकीसाठी एसटी सज्ज ठेवणार

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाळ्याची सोय : अग्नी प्रतिबंधक उपकरण, बॉडी कंडिशनकडे लक्ष देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने राज्यातील सर्व विभागातून जादा वाहतूक केली जाणार आहे. यासाठी फेऱ्या वाढणार असल्याने पुरेशा बसेस उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहे. जादा वाहतुकीच्या कालावधीत सुस्थितीच्या बसेस जातील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्व बसेस आतून-बाहेरून स्वच्छ धुतलेल्या असाव्या, गाड्यांच्या सर्व सीट उत्तम स्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, खिडक्या व्यवस्थित असल्याची खबरदारी घ्यावी, स्पेअर टायर व व्हेईकल टुल द्यावा, टायर सुस्थितीत असावे, गाडी सेल्फ स्टार्ट असावी, वायफर व लाईट चालू असल्याची खात्री करावी, अग्नी प्रतिबंधक उपकरण आणि प्रथमोपचार पेटी आवश्यक त्या औषधांसहीत असल्याची खात्री करावी, गाड्यांची बॉडी कंडिशन तसेच यांत्रिक स्थिती उत्तम असावी आणि विशेष म्हणजे गाडीचा आतील व बाहेरील रंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना विभाग नियंत्रक आदींना देण्यात आल्या आहेत.
रंग उडून गेलेली आणि रंग पुसट झालेली तसेच खराब झालेली वाहने कुठल्याही स्थितीत मार्गावर देण्यात येऊ नये. मार्गावर जाणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाड होणार नाही तसेच यांत्रिक दोषामुळे कोणताही अपघात होणार नाही यादृष्टीने योग्य ती दक्षता घेण्यात यावी, प्रवासी सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्या, असे सूचविण्यात आले आहे. मात्र अनेक आगारांमध्ये बसचा तुटवडा आहे. कामगारांची वाणवा आहे. या सोयी सक्षम असल्याशिवाय सूचविलेल्या उपाययोजना प्रत्यक्ष अंमलात आणणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे या बाबीकडेही महामंडळाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Web Title: To keep the ST ready for more traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.