अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:00 AM2022-02-03T05:00:00+5:302022-02-03T05:00:27+5:30

आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.  

Kelly district changed to bedridden forester | अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची केली जिल्हा बदली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  अर्धांगवायू झाल्याने अंथरुणाला खिळलेल्या वनपालाची थेट जिल्ह्याबाहेर वाशिम येथे बदली केली. इतकेच नव्हे तर त्यांना पुसद येथून तत्काळ कार्यमुक्तही करण्यात आले. या   कारभारामुळे उपासमार होत असून, वनविभागाची यंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याची खंत कर्मचारी रमेश सुरोशे यांनी व्यक्त केली आहे.
 पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रात तपासणी नाक्यावर कार्यरत असताना सुरोशे यांना ९ मे २०१९ रोजी कर्तव्यावर असतानाच अर्धांगवायूचा झटका आला. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. अंथरुणावर असतानाच कुठलीही पूर्वकल्पना न देता सामाजिक वनीकरण वाशिम येथे त्यांची विभाग बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना उपवनसंरक्षक यांनी तत्काळ कार्यमुक्तही केले. 
आजारी असल्याने चालताही येत नसल्याचे उपवनसंरक्षक यांना सांगितले. मात्र त्यांनी  दया दाखविली नसल्याचे सांगत,  महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८१ नियम ७९ परिशिष्ट ३ नियम १ ते १० मधील तरतुदीनुसार अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला लागू होतो. मात्र यानुसारही आपल्याला लाभ देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले.. मे २०१९ पासून आजतागायत  कोणतीही रजा मंजूर केली नाही. 
यामुळे  वेतन, वैद्यकीय खर्चसुद्धा मिळालेला नाही.   जगण्याचा मूलभूत अधिकारच बाधित केला आहे. या अन्यायाविरोधात राज्याच्या लोकायुक्त, वनविभागाचे प्रधान सचिव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सुरोशे यांनी सांगितले.   

रुग्णालयात असताना सक्तीची कार्यमुक्ती का?
- सोईच्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतरही वरिष्ठ त्याला कार्यमुक्त करीत नाही. रमेश सुरोशे यांच्या प्रकरणात ते रुग्णालयात भरती असतानाही त्यांना परस्पर कार्यमुक्त केले. येथे वरिष्ठांनी सहानुभूती दाखविलेली नाही. त्यांना अडचणीच्या काळात मदत सोडा, हक्काचे वेतनही दिलेले नसल्याचे सुराेशे यांनी सांगितले. वनपाल पदावर  एकच पदावधी झालेला असताना विभागाबाहेर केलेली बदलीही निमयबाह्य असल्याचे सुरोशे यांचे म्हणणे आहे.

 शेंबाळपिंपरी वन नाक्यावर असलेले वनपाल रमेश सुरोशे यांची २०१९ मध्ये बदली झाली. मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशावरुनच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती नाही. 
- सचिन सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी

 

Web Title: Kelly district changed to bedridden forester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.