पीक स्पर्धेत खडाका, उटीच्या शेतकऱ्यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:19+5:302021-07-12T04:26:19+5:30
फोटो महागाव : कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रबी हंगाम २०२० स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात तालुक्यातील खडाका येथील ...
फोटो
महागाव : कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रबी हंगाम २०२० स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात तालुक्यातील खडाका येथील हरभरा उत्पादक शेतकरी दत्तराव कदम यांनी प्रथम, विनोद मैंद यांनी द्वितीय, तर गौळ येथील शिवाजी अंगवने यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तालुका कृषी विभागाच्या वतीने या पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील १० हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी भाग घेतला. १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त येथील सटवाराव सभागृहात आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन कदम, मैंद आणि अंगवने यांना गौरविण्यात आले.
यावेळी उपसभापती राम तांबाके, माजी सभापती गजानन कांबळे, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरेंद्र ढोले, विस्तार अधिकारी निरावार, आत्माचे अविनाश वाघमारे, बी.डी. मेंडके, प्रवीण नंदकुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला गटातील शेतकऱ्यांना परसबाग किटचे वाटप करण्यात आले.