यवतमाळमध्ये विसर्जन मिरवणुकीत युवकावर चाकू हल्ला; एकाची प्रकृती गंभीर
By सुरेंद्र राऊत | Published: October 4, 2022 11:24 PM2022-10-04T23:24:25+5:302022-10-04T23:24:44+5:30
या दोन्ही घटनेतील एका युवकाची प्रकृती गंभीर आहे.
यवतमाळ: शहरात मंगळवारी दुपारपासून दुर्गा मंडळाने विसर्जनाला सुरुवात केली आहे. भव्य अशा मिरवणुका काढल्या जात आहे, या मिरवणुकी दरम्यान वाद झाला. आठवडी बाजार येथे युवकावर चाकू हल्ला झाला, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता वाणीपुरा येथे युवकाला चाकूने भोसकले.
या दोन्ही घटनेतील एका युवकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण यशवंत केराम वय 24 वर्ष रा. तलाव फैल असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. पहिल्या घटनेतील जखमी पत्या नामक युवक धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरने सांगितले.
या घटनांनंतर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील बँड डीजे बंद करण्यास सांगितले. रात्री 10 नंतर सर्वच ठिकाणचे बँड पथक बंद करायला लावले , यावरून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वादही घातला. पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला गालबोटाचा प्रकार झाला आहे. अजून नऊ सप्टेंबर पर्यंत देवी विसर्जन चालणार आहे. पुढच्या काही दिवसात शहरात आणखी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची शक्यता आहे.