ज्ञानरचनावाद म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग

By Admin | Published: January 9, 2016 02:53 AM2016-01-09T02:53:11+5:302016-01-09T02:53:11+5:30

ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग होय, हा संदेश शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी

Knowledge based is the way of pleasant learning | ज्ञानरचनावाद म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग

ज्ञानरचनावाद म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग

googlenewsNext

आर्णीत तालुकास्तरीय कार्यशाळा : डिजीटल शाळेला कमी खर्चाचा पर्याय
आर्णी : ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती म्हणजे आनंददायी शिक्षणाचा मार्ग होय, हा संदेश शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानरचनावादी तालुकास्तरीय कार्यशाळा आर्णी येथे पार पडली. तिथे डिजीटल शाळा करणे शक्य नाही अशा ठिकाणी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करून मुलांना प्रगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
तालुकास्तरीय ज्ञानरचनावादी कार्यशाळेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांच्या पुढाकाराने बीआरसीच्या सभागृहामध्ये शुक्रवारी करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी पुसद तालुक्यातील मनसळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय विश्वकर्मा, सहकारी उपस्थित होते. त्यांनी अतिशय सोप्या व सुटसुटीत पद्धतीने मुलांना हसत खेळत कसे शिकविता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यात पहिल्या वर्गातील विद्यार्थीही लिहिण्यात, बोलण्यात आणि ओळखण्यात कशा पद्धतीने तरबेज होवू शकतात, हे या प्रात्यक्षिकातून शिक्षकांपुढे मांडण्यात आले. मागील १३ वर्षांपासून विश्वकर्मा ज्ञानरचनावादी पद्धतीचे अध्यापन प्रामाणिकपणे करत आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून किंवा इतर कोणाकडूनही त्यांना लोकवर्गणीची कधीच गरज पडली नाही. ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये लागणारे साहित्य मी स्वत: तयार केले. आज माझ्या शाळेमध्ये ही पद्धत पाहण्यासाठी अनेकजण येतात, असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी डिजीटल शाळा असली तरी वीज पुरवठा अनियमित असल्याने अडचणी येतात. याला सशक्त पर्याय म्हणजे ज्ञानरचनावाद पद्धत उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्ञानरचनावाद तालुकास्तरीय कार्यशाळेला तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका, गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, विस्तार अधिकारी शुभदा पाटील व इतर सहकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Knowledge based is the way of pleasant learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.