ज्ञान, शिक्षण, परिश्रमानेच आयुष्याची जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:43 PM2018-02-18T23:43:34+5:302018-02-18T23:43:56+5:30

त्याग, परिश्रम, संघर्ष आणि महापुरुषांच्या विचारांचा वसा घेऊन नेहरू शिक्षण संस्थेने वाटचाल केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा कौशल्यासह चांगल्या सवयी ठेवून ज्ञान, शिक्षण, परिश्रमाने आयुष्याची जडणघडण करावी,...

Knowledge, education, hard work, life-style | ज्ञान, शिक्षण, परिश्रमानेच आयुष्याची जडणघडण

ज्ञान, शिक्षण, परिश्रमानेच आयुष्याची जडणघडण

Next
ठळक मुद्देरणजित पाटील : नेहरू महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

ऑनलाईन लोकमत
नेर : त्याग, परिश्रम, संघर्ष आणि महापुरुषांच्या विचारांचा वसा घेऊन नेहरू शिक्षण संस्थेने वाटचाल केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा कौशल्यासह चांगल्या सवयी ठेवून ज्ञान, शिक्षण, परिश्रमाने आयुष्याची जडणघडण करावी, असे आवाहन राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले.
ते नेहरू महाविद्यालयात संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारोहात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल होते. सचिव हाजी मजरखाँ पठाण, प्राचार्य डॉ. राजीव सदन, रवी अग्रवाल, राजेंद्र चिरडे, सुनिल धोटकर, राजेंद्र अग्रवाल, हाजी मोहम्मद युसूफ, भाष्कर सोनोने, विद्यापीठ प्रतिनिधी गोपाळ राठोड उपस्थित होते.
राज्यमंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रबांधणीत महत्त्वाचा वाटा असणारे विजय भटकर, कल्पना चावला यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी संघर्षरत राहिले पाहिजे. कला आणि विचार यांचा संगम विद्यार्थ्यांत असावा. प्राचार्य डॉ. राजीव सदन म्हणाले की, ग्रामीण परिवाराची गरज लक्षात घेऊन संयोजन नियोजनातून या महाविद्यालयाने वाटचाल केली. गुणवत्ता, शिस्त, मोबाईल वाचनालय आदींतून नॅक मूल्यांकनाचे यश आकारास आले. संचालन प्रा.शशिकांत अरसोड यांनी केले. तर आभार प्रा. शांतरक्षित गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Knowledge, education, hard work, life-style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.