कोपरा-येरंडा बंधारा कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:26 PM2017-12-30T22:26:26+5:302017-12-30T22:26:36+5:30
तालुक्यातील कोपरा-येरंडा येथील कोल्हापुरी बंधाºयाची प्रचंड दुरावस्था झाली. या बंधाºयात एकही थेंब पाणी साचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील कोपरा-येरंडा येथील कोल्हापुरी बंधाºयाची प्रचंड दुरावस्था झाली. या बंधाºयात एकही थेंब पाणी साचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
आघाडी सरकारच्या काळात कोपरा-येरंडा येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाला युती शासनाच्या काळात अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या बंधाºयाकडे दुर्लक्ष झाले. दुसरीकडे युती शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या अभियानाची जलद गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र आधीच अस्तित्वात असलेल्या या कोल्हापुरी बांधाºयाकडे यंत्रणेचे लक्ष गेले नाही.
शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे या उद्देशाने २५ वर्षापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने कोपरा-येरंडा येथे पूस नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाच्या माध्यमातून कोपरा व येरंडा गावाला जाणारा रस्ता तेवढा तयार झाला. मात्र सिंचनासाठी पाणी मिळू शकले नाही. या बंधाºयात पाणीच साठले नसल्याने लगतच्या परिसरातील भूजल पातळीतही वाढ झाली नाही. आता या बंधाºयाचे लोखंडी बर्गे चोरीला गेले आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही बंधाºयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
सिंचन विभागाच्या अखत्यारितील हा बंधारा दुरावस्थेत आहे. परिणामी शेतकºयांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. या बंधाºयाची दुरुस्ती केल्यास शेकडो हेक्टर जमिनीला पाणी उपलब्ध होवू शकते. मात्र सिंचन विभागाच्या उदासीन धोरणामुळे बंधारा दुरावस्थेत आहे. तूर्तास हा बंधारा कोरडा ठक पडून आहे.
पाणीटंचाई तीव्र
कोपरा-येरंडा बंधाºयाची दुरुस्ती केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. उन्हाळ्यात पूस नदी कोरडी पडते. त्यामुळे मानवासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधाºयाची दुरुस्ती झाल्यास त्यात पाणी थांबून लगतच्या भूजल पातळीतही वाढ होवू शकते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. सध्या बंधाºयाचे बरगे चोरीस गेल्याने या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.