ढाणकी येथे लोकसहभागातून कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:57+5:302021-05-15T04:39:57+5:30
जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : गोरगरीब मजुरांनीही दवाखान्यासाठी दिले योगदान ढाणकी : कोरोनाने ...
जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर
जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : गोरगरीब मजुरांनीही दवाखान्यासाठी दिले योगदान
ढाणकी : कोरोनाने ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सर्वसामान्य नागरिकांनी लोकवर्गणी करून चक्क कोविड सेंटर उभारले आहे. लोकसहभागातून सुरू झालेले हे जिल्ह्यातील पहिलेच कोविड सेंटर ठरले.
शुक्रवारी या कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे, उद्घाटक आमदार नामदेवराव ससाने उपस्थित होते. या चळवळीसाठी दानदात्यांचे काम अतिशय मोलाचे आहे. कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत, असे आश्वासन आमदार ससाने यांनी दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस हे कोविड सेंटर उभे राहिले.
मंचावर नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल, उपाध्यक्ष जहीरभाई, वसंतराव ऊर्फ बाळू पाटील चंद्रे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, पं. स. सभापती प्रज्ञानंद खडसे, जि. प. सदस्य चितांगराव कदम, तहसीलदार आनंद देऊळगावकर, सीओ आकाश सुरडकर, ठाणेदार विजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर कपाळे, डाॅ. लक्ष्मीकांत रावते, पोलीस पाटील रमण रावते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बळीराम मुटकुळे, संदीप ठाकरे उपस्थित होते.
===Photopath===
140521\img-20210514-wa0122.jpg
===Caption===
ढाणकी कोविड सेंटर चा लोकार्पण सोहळा संपन्न.
जिल्हातील पहिले लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर.