शिवणी परिसरात कोविड चाचणी, जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:34+5:302021-06-01T04:31:34+5:30

घाटंजी : तालुक्यातील शिवणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करून कोविड चाचणी करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे ...

Kovid test, public awareness in Shivani area | शिवणी परिसरात कोविड चाचणी, जनजागृती

शिवणी परिसरात कोविड चाचणी, जनजागृती

Next

घाटंजी : तालुक्यातील शिवणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करून कोविड चाचणी करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहे. याच योजनेचा भाग म्हणून तहसीलदार पूजा माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेझरी, सेवानगर, घाटुंबा येथे कोविड चाचणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी कोविड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित नागरिकांना कोविडपासून मुक्त होण्यासाठी चाचणी करणे गरजेचे असल्याचे पटवून देण्यात आले. साधारण आजार नागरिकांनी अंगावर न काढता तपासणी करून उपचार केल्यास आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहू शकतो, याबद्दल जनजागृती करण्यात आली.

मंडळ अधिकारी यशवंत शिरभाते, ग्रामसचिव संदीप वाघ, तलाठी बाळकृष्ण येरमे, परिचारिका काजल वाघाडे, एस.डी. मके, मोहम्मद जामिर शेख, आशा सेविका मनीषा उईके, बंजारा टायगर्सचे शहराध्यक्ष संजय आडे, पोलीस पाटील राजेश चव्हाण, सरपंच निळू राठोड, सदस्य राजेश राठोड, अजाब आत्राम, श्रीराम जाधव, कोतवाल भगवान जुमनाके, सुनील गेडाम आदी उपस्थित होते. संजय आडे व यशवंत शिरभाते यांच्यामार्फत गावकऱ्यांना कोरोनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले.

Web Title: Kovid test, public awareness in Shivani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.