उमरखेडमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:09+5:302021-05-07T04:44:09+5:30
उमरखेड : येथील राजाराम प्रभाजी उतरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये येत्या ४ दिवसांत ३० खाटांचे सर्व सुविधांयुक्त ...
उमरखेड : येथील राजाराम प्रभाजी उतरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये येत्या ४ दिवसांत ३० खाटांचे सर्व सुविधांयुक्त कोविड उपचार केंद्र सुरू होणार आहे.
या कामाची जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस आदींनी बुधवारी पाहणी केली. शहर व तालुक्यात काेरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे येथील शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बुधवारी रात्री ९ वाजता डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ येथे धडकले होते.
यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय चेके, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण, डॉ. मधुकर मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर कपाळे, पुसद अर्बन बँकेचे गोपाल अग्रवाल, सचिन गाडगे, मुजीब खतीब आदी उपस्थित होते.
बॉक्स
डॉक्टरांची चमू झाली सज्ज
शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण यांच्या मार्गदर्शनात डॉ. हनुमंत धर्मकारे, डॉ. जुनेद खान, डॉ. आशिष उगले, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. राधेशाम जगताप, डॉ. नितीन कदम, डॉ. अजमत जागीरदार, डॉ. मनोहर वंदे, डॉ. पाडुरंग मुलगीर, डॉ. स्वप्नील जीवने, डॉ. सुमेधा राठोड, डॉ. अरविंद वानखेडे, डॉ. भाग्यश्री कोडगीरवार, डॉ. ईशरत अबरार, डॉ. स्वाती उपरीकर आदी डॉक्टरांची चमू कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोट
३० खाटांसाठी लागणारे पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर, सर्व साहित्य व औषधी साठा आला आहे. शासकीय रग्णालयाच्या नवीन वास्तूत ३० खाटांचे डीसीएचसी सेंटर येत्या ४ दिवसांत सुरू होईल.
डॉ. रमेश मांडण
वैधकीय अधीक्षक, वर्ग १, उमरखेड