कामठवाडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:47+5:302021-07-08T04:27:47+5:30
दारव्हा : तालुक्यातील कामठवाडा येथे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ...
दारव्हा : तालुक्यातील कामठवाडा येथे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच छाया डवरे यांनी केले. बोरीचे मंडळ कृषी अधिकारी एन.के. भरणे, चाणीच्या सरपंच ज्योती दत्ता गजभिये, उपसरपंच गजानन गुल्हाने, कामठवाडाच्या उपसरपंच पार्वती ढंगारे, एन.ए. ठक, पी.एस. बोईनवाड, शिवशंकर ठोकळ, विलास राठोड, मिलिंद ठोकळ, रामनाथ खडके, रामभाऊ पारधी, दत्ता गजभिये, भीमराव आडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर याबाबत एन.के. भरणे यांनी मार्गदर्शन केले. कापूस एक गाव, एक वान, विकेल ते पिकेल, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, दोन पिकाची उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, महत्त्वाच्या पिकाची कीड व रोग नियंत्रणाचे उपाययोजना, कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम याविषयी पी.एस. बोईनवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
070721\img-20210701-wa0009.jpg
कामठवाडा कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप