कुंकवाच्या कार्यक्रमातच उरकले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:46 PM2018-02-13T21:46:48+5:302018-02-13T21:47:07+5:30

विवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Kunkawa's program will have a better marriage | कुंकवाच्या कार्यक्रमातच उरकले लग्न

कुंकवाच्या कार्यक्रमातच उरकले लग्न

Next
ठळक मुद्देशेतकरी कुटुंब : पाटणबोरी-मांजरी येथील वर-वधूंचा पुरोगामीपणा

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : विवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
घाटंजी जवळील मांजरी गावात हा विवाह पार पडला. वडिलांचे छत्र हरविलेल्या येथील मुलीसोबत दाभा पाटणबोरी येथील मुलाने परिवर्तनवादी विचाराने विवाह केला. मांजरी येथील श्वेताली पुंडलिक गावंडे हिच्यासोबत झरी तालुक्यातील दाभा पाटणबोरी येथील विशाल विठ्ठलराव भोयर या तरुणाची सोयरीक झाली होती. रविवारी ११ फेब्रुवारीला कुंकू लावण्याचा कार्यक्रम ठरला होता. मुलाचे शिक्षक असलेले काका माणिकराव भोयर, संजय भोयर, लोकेश भोयर व शेतकरी वडील विठ्ठलराव, काका गंगाधर यांनी कुंकवाच्या कार्यक्रमातच लग्न उरकण्याचा निर्णय घेतला. तसे मत त्यांनी मुलीकडील मंडळींना कळविले. हा निरोप मिळताच मुलीची आई व मावसकाका दिलीप डहाके, मामा सुभाष भोयर यांनीही तातडीने होकार दिला. श्वेतालीचे वडील दोन वर्षांपूर्वी किडणीच्या आजाराने दगावले. त्यांच्याकडे सात एकर जमीन असून आईच शेती करते. दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबांनी खर्च आणि गाजावाजा टाळून रविवारी अत्यंत साधेपणाने तरीही मोठ्या उत्साहात विवाह आटोपला. यावेळी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

Web Title: Kunkawa's program will have a better marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.