दुर्मिळ औषधी वृक्षांवर चालतेय कुऱ्हाड

By admin | Published: April 28, 2017 02:38 AM2017-04-28T02:38:27+5:302017-04-28T02:38:27+5:30

तालुक्यातील जंगलांमध्ये दुर्मिळ वनौषधी वृक्ष असून या वृक्षांवर आता कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहे.

Kurakh runs on rare medicinal plants | दुर्मिळ औषधी वृक्षांवर चालतेय कुऱ्हाड

दुर्मिळ औषधी वृक्षांवर चालतेय कुऱ्हाड

Next

राजरोस वृक्षतोड : पुसद तालुक्यातील जंगलांकडे वन विभागाचे दुर्लक्ष
पुसद : तालुक्यातील जंगलांमध्ये दुर्मिळ वनौषधी वृक्ष असून या वृक्षांवर आता कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहे. त्यामुळे वनौषधीचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे. मात्र वन विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
पुसद तालुक्यातील जंगलांमध्ये सागवान वृक्षांसह मोठ्या प्रमाणात वनौषधी आहे. या वनौषधीची माहिती असलेले केवळ झाडाचे औषधीसाठी लागणारे भाग तोडून नेतात. परंतु ज्यांना या वनौषधीची माहिती नाही ते मात्र दुर्मिळ वृक्ष बुडापासून तोडून टाकत आहेत. अनेकदा सरपनाच्या नावाखाली या वृक्षांची कत्तल केली जात आहे. वन विभाग मात्र केवळ सागवान तस्करी रोखण्यासाठीच प्रयत्न करीत आहे. परंतु आंबा, जांबूळ, कडूनिंब, बिहाडा, खैर आदी औषधी उपयुक्त वृक्षांची कत्तल थांबविण्यास पुढाकार घेत नाही. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Kurakh runs on rare medicinal plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.