बांधकाम अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:15 PM2018-05-19T23:15:36+5:302018-05-19T23:15:36+5:30

शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटकविले.

Lack of construction engineer's chair | बांधकाम अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण

बांधकाम अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण

Next
ठळक मुद्देनिवेदन चिटकविले : नेर येथील अतिक्रमणधारकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटकविले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात १६ मे रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटरची आखणी चुण्याने करण्यात आली. अनेकांची दुकाने आखणी झालेल्या जागेपासून बाहेर असल्याने त्यांनी अतिक्रमण काढले नाही. नंतर मात्र सरसकट अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला. दुसरीकडे काही दुकानांसमोर दोन तासपर्यंत बुलडोजर थांबवून त्यांना अतिक्रमण काढण्याची संधी देण्यात आली, तर काही लोकांना पाच दिवसांचा अवधी देण्यात आला.
मोहीम राबविताना झालेला दुजाभाव, अतिक्रमण काढण्याची नियमबाह्य पद्धत याविषयी रोष व्यक्त करत येथील अतिक्रमणग्रस्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले. याठिकाणी उपअभियंता भूपेश कथलकर उपस्थित नव्हते. त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून आपला राग व्यक्त करण्यात आला. यानंतर ते पोलीस ठाण्यावर धडकले. उपअभियंता भूपेश कथलकर, एस.डी. माही, कलंत्री यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. जगदीश शंकर डवरे यांचे वडील शंकर डवरे यांच्या झेरॉक्स सेंटरचे नुकसान करण्यात आले. जगदीश डवरे यांनी तक्रार नोंदविली. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, लीज पट्ट्यावर दुकान मिळावे या मागणीसाठी २५ मे रोजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. यावेळी नगरसेवक सुनील खाडे, इरफान आकबानी, आशीष खोडे, प्रशांत वंजारी, विष्णू तवकार, अ‍ॅड. सलीम शाह, सुनील वानखडे, मधुकर इंगोले आदी उपस्थित होते.

Web Title: Lack of construction engineer's chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.