दिग्रस तालुक्यात सुरक्षा किटचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:11+5:30
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविका तोकड्या मानधनात २४ तास सेवा देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा व अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम सोपविण्यात आले. मात्र त्यांना सुरक्षा किट मिळाली नसल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविका तोकड्या मानधनात २४ तास सेवा देत आहे. मात्र त्यांच्याजवळ सुरक्षा किट नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हे कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देतात. स्थलांतरितांच्या नोंदी घेतात. कुणाला लक्षणे आढळल्यास होम क्वारंटाईन करतात. मात्र संशयितांची माहिती गोळा करताना त्यांनाच पुरेसे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. शासनाने त्यांचीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून किमान त्यांना सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उन्हातान्हात काम
आशा व अंगणवाडीसेविका रखरखत्या उन्हात गावपातळीवर सर्वेक्षण करीत आहे. तोकड्या साधनांसोबत त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. केवळ तालुक्यातील जनतेच्या काळजीपोटी त्या कार्यरत आहे.