अल्पभूधारक शेतकरी मृत्यूनंतरही ठरला लोकोपयोगी

By admin | Published: January 14, 2017 01:52 AM2017-01-14T01:52:59+5:302017-01-14T01:52:59+5:30

शेतकऱ्याचे अख्खे आयुष्य समाजासाठी अन्न पिकविण्यातच खर्ची पडते. आयुष्यभर तो हाडाची काडं करीत राहातो.

Lack of small-scale farmer's death | अल्पभूधारक शेतकरी मृत्यूनंतरही ठरला लोकोपयोगी

अल्पभूधारक शेतकरी मृत्यूनंतरही ठरला लोकोपयोगी

Next

गोडे ठरले नावाप्रमाणे पुरुषोत्तम : प्रत्यक्ष अवयदानाच्या प्रक्रियेची बाभूळगावातील पहिली घटना
आरिफ अली ल्ल बाभूळगाव
शेतकऱ्याचे अख्खे आयुष्य समाजासाठी अन्न पिकविण्यातच खर्ची पडते. आयुष्यभर तो हाडाची काडं करीत राहातो. तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने परोपकाराचा हा प्रवास आणखी एक पाऊल पुढे नेला आहे. या शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. पण जगातून जाता-जाता त्याने आपले अवयव दान करून जगाला कृषीवलांच्या दातृत्वाचा नवा परिचय करून दिला. सत्कर्माला शोभणारेच त्याचे नावही पुरुषोत्तम गोडे!
तालुक्यातील सारफळी येथील पुरुषोत्तम वासुदेवराव गोडे (४५) सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये भरून धामणगावकडे जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरवरून पडून गंभीर जखमी झाले. त्यांना बाभूळगाव, यवतमाळ व पुढे सावंगी मेघे येथे हलविण्यात आले. ११ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. जनतेची कामे घेऊन बाभूळगावात येणारा, सरकारी कार्यालयात पोटतिडकीने खेडूतांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडणारा पुरुषोत्तम आता या जगात नाही. ही माहिती जेव्हा डॉक्टरांनी पुरुषोत्तमची पत्नी प्रितीला दिली, तेव्हा तिने हंबरडाच फोडला. मात्र काही क्षणातच तिने स्वत:ला सावरले. मृत पुरुषोत्तमचे डोळे, यकृत आणि किडणी दान करण्याचा निर्णय तिने डॉक्टरांना सांगितला. यावेळी प्रितीसोबत सावंगी मेघे येथील रुग्णालयात मृताचे मोठे बंधू भरत गोडे, सतीश सराड, चिंतामण गावंडे, आशीष सराड, पिंटू गावंडे, सासरे विनोद दरणे, जावई प्रमोद खेवले, दीपक राऊत, मोहन वानखडे, सामाजिक कार्यकर्ते लाला गावंडे उपस्थित होते. डॉक्टरांनी अवयव दान करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र तयार केली. त्यावर प्रितीताईने डबडबलेल्या डोळ्यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर पुरुषोत्तमचे डोळे, यकृत आणि किडणी काढण्यात आली. प्रक्रिया आटोपल्यावर मृतदेह प्रिती व अन्य नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. गुरुवारी सारफळी येथे शेकडो महिला, पुरुषांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरुषोत्तमच्या मागे पत्नी, एक मुलगा, वृद्ध आईवडील आहे. लहानशा गावातील एका महिलेने आपल्या पतीचे अवयव दान करण्याची परवानगी देणे, ही बाब वेधक आहे.

Web Title: Lack of small-scale farmer's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.