प्रसूत महिलांना एकाच वेळी इन्फेक्शन; यवतमाळमधील प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:30 AM2019-05-12T04:30:48+5:302019-05-12T04:30:57+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.

 Lactation in women at the same time; Yavatmal episode | प्रसूत महिलांना एकाच वेळी इन्फेक्शन; यवतमाळमधील प्रकरण

प्रसूत महिलांना एकाच वेळी इन्फेक्शन; यवतमाळमधील प्रकरण

Next

- सुरेंद्र राऊत

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत.
प्रसुती विभागात २१ एप्रिल रोजी सिझरिंगझालेल्या महिलांनी शस्त्रक्रियेच्या ठिकाणी प्रचंड दुखत असल्याची तक्रार केली. परंतु थोडी कळ सोसा, असे सांगत त्यांना अंधारात ठेवण्यात आले. एवढे दिवस कसले उपचार सुरू आहेत, याबद्दल महिलांच्या नातेवाईकांनी चौकशी केल्यावर प्रकरणाचा भंडाफोड झाला. याबाबत जास्त कु रबूर केल्यास थेट धमकावले जाते, असा आरोप प्रसूत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील प्रसुती विभागात फेरफटका मारल्यावर इन्फेक्शन झालेल्या प्रसूत महिला आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड दडपणात असल्याचे आढळून आले.

प्रसूत महिलांबाबत इन्फेक्शनचा प्रकार गंभीर आहे. आगामी बैठकीत याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली
जाईल.
- डॉ. अशोक उईके, अध्यक्ष, अभ्यागत मंडळ, शासकीय रुग्णालय, यवतमाळ.

Web Title:  Lactation in women at the same time; Yavatmal episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.