तेंडोळीत महिलांची दारूवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:41 PM2018-01-05T21:41:40+5:302018-01-05T21:41:55+5:30
तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली.
तेंडोळी गावात मोठ्या प्रमाणात दारू विकली जात होती. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. दारूबंदी व्यसनमुक्त आंदोलन समितीच्या पदाधिकारी सुमित्रा जाधव व गावातील महिलांनी दारू विक्रेता गणेश राठोड यांच्या घरी धाड मारली. त्यावेळी एक ड्रम गावठी दारू आणि मोहा फुलाचा माच आढळून आला. त्यानंतर लगेच बोरगाव येथे धाड मारून सहा ड्रम मोहा मोच जप्त करण्यात आला. तेथे विजय राठोड यांच्या घराची झडती घेण्यात आली. दारू विक्रेता मात्र पसार झाला होता. आर्णी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी बोरगाव दारूबंदी व्यसनमुक्तीच्या सीताबाई चव्हाण व महिला उपस्थित होत्या. आर्णी तालुक्यात दारूबंदीसाठी मायाताई मानकर, गोपाबाई राठोड, प्रेमिला शहारे, सुशीला हटवारे, वंदना शिंदे, शेवंता नारनवरे, लिला भुरे, आशा मानकर, रेणुका राठोड, प्रवीण भरणे प्रयत्न करीत आहेत. त्यांना लिलाधर दहीकर, जितेश राठोड, किशोर अरसोड, सतीश जीवने, राजू मोगरे, अक्षय खोब्रागडे मदत करीत आहे.