यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 10:21 AM2021-02-06T10:21:52+5:302021-02-06T10:22:25+5:30

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील  दिग्रस शहरातील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला . यामुळे  जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइप मधून जवळपास ३० फूट उच्च पाण्याचे फवारे उडत होते.

Lakhs of liters of water wasted due to bursting of aqueduct in Digras in Yavatmal district |  यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

 यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
 यवतमाळ : जिल्ह्यातील  दिग्रस शहरातील मानोरा चौककडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला . यामुळे  जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइप मधून जवळपास ३० फूट उच्च पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दिग्रस  शहराच्या लगतच असलेल्या अरूणावती धरणावरून मानोरासह तालुक्यातील २८ गावांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

जवळपास ३० फुट उंच हा फवारा सुरू आहे. हा फवारा इतका उंच की जलवाहिनीच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श करत होता. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना, तसेच जवळच असणाऱ्या दुकानदारांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु विद्युत प्रवाह बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला .

Web Title: Lakhs of liters of water wasted due to bursting of aqueduct in Digras in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी