जिजामाता कन्या शाळा मोजतेय अखेरची घटका

By admin | Published: February 26, 2017 01:14 AM2017-02-26T01:14:59+5:302017-02-26T01:14:59+5:30

स्त्री शिक्षणाचा सात दशकांपासून पुसद शहरात अविरत प्रसार करणाऱ्या येथील जिजामाता माध्यमिक कन्या शाळा आता अखेरच्या घटका मोजत आहे.

The last element to count the girls' school of Jijamata | जिजामाता कन्या शाळा मोजतेय अखेरची घटका

जिजामाता कन्या शाळा मोजतेय अखेरची घटका

Next

पटसंख्येला ओहोटी : सात दशकांची साक्षीदार शाळा दुर्लक्षित
पुसद : स्त्री शिक्षणाचा सात दशकांपासून पुसद शहरात अविरत प्रसार करणाऱ्या येथील जिजामाता माध्यमिक कन्या शाळा आता अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशस्त इमारत आणि सर्व सुविधा असतानाही जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेकडे मुलींनी पाठ फिरविली आहे. एके काळी ७०० च्या आसपास असणारी पटसंख्या आता अवघ्या १८० वर आली आहे. पुसदच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.
पुसद येथे १९४८ साली जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक कन्या शाळेची स्थापना झाली. जिल्ह्यातील मोजक्या शाळेतील ही आदर्श अशी शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत या ठिकाणी मुलींना शिक्षण दिले जाते. शहराच्या मध्यभागी प्रशस्त जागेवर ही शाळा आहे. या शाळेत १६ वर्गखोल्या, एक हॉल, एक आॅफीस, लिपीक आॅफीस यासह जीवशास्त्र, भौतिक शास्त्राची प्रयोगशाळा आणि संगणक कक्षही आहे. पुसद शहरातील शेकडो मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य या शाळेने केले आहे. परंतु अलिकडे खासगी शाळांचे पेव फुटले आणि पटसंख्या घटू लागली. पूर्वी या शाळेत शहरातील गरीब-श्रीमंतांच्या मुली शिकत होत्या. त्यावेळी ७०० च्या आसपास पटसंख्या असायची. एका-एका वर्गाच्या दोन-दोन तुकड्या असायच्या. परंतु आता या शाळेची पटसंख्या १८० वर येऊन ठेपली आहे. पूर्वी येथे शिक्षकांची संख्याही मोठी असायची परंतु आता केवळ नऊ शिक्षक येथे ज्ञानदाचे कार्य करीत आहे. श्रीमंतांनी तर या शाळेकडे पाठ फिरविली. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुली येथे शिक्षण घेतात. या ठिकाणी
असलेले शिक्षक पटसंख्या टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबवितात. परंतु पालक प्रतिसाद देत नाहीत.
शाळेच्या प्रशस्त इमारतीला बकाल स्वरूप आले आहे. एका बाजुचे छत कोसळले असून, त्याची अद्यापही डागडुजी केली नाही. शाळेच्या विस्तीर्ण मैदानाचीही अवस्था वाईट आहे. रात्रीच्यावेळी या परिसराचा उपयोग महिला हागणदारीसाठी करतात. दिवसभर शाळेच्या मैदानात मोकाट जनावरे आणि डुकरांचा सुळसुळाट झालेला असतो.
जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या या शाळेलगतच विविध शासकीय कार्यालये आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत परंतु कुणीही याकडे लक्ष देत नाही. पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान या शाळेलगत आहे. उपविभागीय अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले होते. त्यांनी या शाळेची दुरावस्था अगदी जवळून बघितली. परंतु जिल्हा परिषदेत गेल्यानंतर या शाळेच्या विकासासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे पालक सांगतात. शिक्षणाची गंगोत्री असलेल्या या शाळेच्या विकासासाठी आता पुसदकरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. (कार्यालय चमू)

Web Title: The last element to count the girls' school of Jijamata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.