३०२ कोटींच्या अमृत योजनेचा शुभारंभ

By admin | Published: April 14, 2017 02:37 AM2017-04-14T02:37:34+5:302017-04-14T02:37:34+5:30

शहरातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत ३०२ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

Launch of Amrut Yojna of 302 crores | ३०२ कोटींच्या अमृत योजनेचा शुभारंभ

३०२ कोटींच्या अमृत योजनेचा शुभारंभ

Next

२४ तास पाणीपुरवठा : बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात येणार
यवतमाळ : शहरातील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत ३०२ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. बेंबळा प्रकल्पातून योजनेद्वारे मुबलक पाणी मिळणार असून या योजनेचे गुरुवारी नगर परिषद कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नगर परिषदेचे सभापती मोहन देशमुख, नितीन गिरी, सुषमा राऊत, स्थायी समिती सदस्य जगदीश वाधवाणी, जावेद अन्सारी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुरेश चारथळ, दिनेश बोरकर, मुध्याधिकारी सुदाम धुपे यांच्यासह नगरसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ शहरासाठी सध्या असलेली पाणी पुरवठा योजना अपुरी आहे. शिवाय काही गावे शहरात समाविष्ट झाल्याने पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न होता.
अमृत अभियानांतर्गत ३०२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. बेंबळा प्रकल्पातून सदर पाणी पुरवठा केला जाईल. दोन टप्प्यात अडीच वर्षात योजनेचे काम पूर्ण होणार आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर यवतमाळ शहरास मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी नगराध्यक्षा कांचनताई चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्याच्या हस्ते ई-भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी ई-भूमिपूजन झाले. यवतमाळ नगर परिषदेच्या सभागृहात वेबकास्टद्वारे यवतमाळकरांनी हा आगळावेगळा सोहळा अनुभवला. नगर परिषदेच्या सभागृहात ई-भूमिपूजन सोहळा वेबकास्टद्वारे लाईव्ह पाहण्यात आला.

Web Title: Launch of Amrut Yojna of 302 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.