कळंब येथे कापूस खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 10:51 PM2017-10-25T22:51:53+5:302017-10-25T22:52:04+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस पणन महासंघाच्यावतीने आज शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस पणन महासंघाच्यावतीने आज शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कापूस विक्री करणारे शेतकरी शालीनी दिवाकर माळवी, प्रवीण राखुंडे, भिमराव घोडे, सुनील मलकापूरे या शेतकºयांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ४ हजार १२० ते ४३२० रुपये क्विंटल या आधारभूत किंमतीवर कापूस खरेदी केला जाणार आहे. शेतकºयांनी प्रथम बाजार समितीमध्ये सातबारा व पेरेपत्रक घेऊन कापूस विक्रीची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच कापसाची खरेदी केली जाणार आहे, याची शेतकºयांनी नोंद घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, चंद्रशेखर चांदोरे, योगेश धांदे, विवेक रामटेके, पंजाब भिसे, बाळासाहेब मानेकर, राजेश भोयर, व्यवस्थापक तुषार देशमुख, महासंघाचे झोनल अधिकारी गोस्वामी, गे्रडर शेंडे, जिरापूरे आदी उपस्थित होते.