आर्णीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:39 PM2018-06-01T22:39:52+5:302018-06-01T22:39:52+5:30
शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध व्यसाय करणारे निर्धास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध व्यसाय करणारे निर्धास्त आहे.
आर्णी शहरासह जवळा हे गाव अवैध व्यवसायाचे ‘माहेर’ घर झाले आहे. शहरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध दारूविक्री, गुटखा विक्री सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार अड्डे सुरू आहे. याला ग्रामीण भागातील नागरिक, युवक बळी पडत आहे. ग्रामीण भागात अनके ठिकाणी गावधी दारू विक्रीने हैदोस घातला आहे. यात अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे.
आर्णी आणि जवळा येथे गुटखा व्यवसायातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. कारंजामार्गे जवळात पोहोचलेला गुटखा तालुकयातील ग्रामीण भागात पोहोचविला जात आहे. मात्र पोलिसांना या सर्व बाबींकडे लक्ष देण्यास सवळ नाही. ठाणेदार नंदकिशोर पंत यांची बदली झाल्याने आर्णी पोलीस ठाण्याचा कारभार ढेपाळला आहे.
अवैध व्यावसायीकांवर कुणाचाच वचक उरला नाही. वरिष्ठांचेही या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय चांगलेच फोफावत आहे. गेल्या दीड महिन्यापासून पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला आहे. त्याचाच लाभ घेत अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीचा उच्चांक
शहरास तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. शहरात खासगी ट्रव्हल्स, आॅटोरिक्षा चालकांची मुजोरी वाढली आहे. महामंडळाच्या बसलाही रस्ता मोकळा करून दिला जात नाही. अनेकदा वादावादी होते. यातून महिला, युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थिनींना रोडछाप मजनू त्रस्त करून सोडत आहे. अनेक चौकात दादागिरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस मात्र केवळ वसुलीत गुंग आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांना मोकाट सोडण्यात आले आहे. परिणामी एकाच ुआॅटोरिक्षात कोंबड्याप्रमाणे प्रवासी कोंबले जात आहे.