न्यायाधीशांसह वकील, कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:16 PM2018-02-21T22:16:54+5:302018-02-21T22:18:40+5:30
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क तर्फे जिल्हा न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात न्यायाधीशांसह कर्मचारी, वकील आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्या. ए.टी. वानखेडे, जिल्हा न्यायाधीश एम.ए. मोहिनुद्दिन, दिवाणी न्यायाधीश आर.आर. राजूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ. विकास येडशीकर आदी उपस्थित होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे, संघटनेचे अध्यक्ष निरंजन होले, सचिव प्रशांत देशमुख, विनोद चव्हाण, अंबुलकर, विनोद खंडारे, अमोल ठाकरे, बांबोर्डे, प्रफुल्ल ठाकरे यांच्यापासून रक्तदानाला सुरुवात झाली. वर्षा अढाव, योगिता दरणे, ताई दीक्षित, आर.आर. चिल्लजवार आदी महिला कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले.
यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम बक्षिसाच्या मानकरी जे.सी. बुराडे ठरल्या. मंगेश इंगळे यांनी दुसरे बक्षीस पटकाविले. वर्षा अढाव यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. शिवाय ११ जणांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. बक्षिसासाठी अॅड. सोधी, संजय थूल, प्रशांत देशमुख आदींचे सहकार्य लाभले.
आनंद मेळाव्यात १४ स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शासकीय रक्तपेढीचे अधीक्षक जानकर, प्रबंधक व्ही.के. तांबेकर, रायकुंवर, विनोद चव्हाण, संजय चौधरी, प्रफुल्ल ठाकरे, राजेश संभे, सुधीर येडमे, गजेंद्र अंबाडकर, पी.आर. गुल्हाने, उत्तम पाटील, अमोल ठाकरे, मो. शफीक मो. रफिक शेख, नंदकुमार काणे, विलास कुºहाडे, मिलिंद जीवने यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदींनी पुढाकार घेतला.