देऊरवाडीच्या नागरिकांना मिळणार जागेचे लीजपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:29 PM2018-10-26T22:29:52+5:302018-10-26T22:30:20+5:30

तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे.

Leaseholders of the place to get the citizens of Dewarwadi | देऊरवाडीच्या नागरिकांना मिळणार जागेचे लीजपट्टे

देऊरवाडीच्या नागरिकांना मिळणार जागेचे लीजपट्टे

Next
ठळक मुद्देगावठाण मंजूर : अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे. मात्र जागेच्या मालकी हक्काअभावी त्यांना मूलभूत सुविधा व वैयक्तिक लाभ मिळत नव्हता. याकरिता त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. आता गावठाणला मंजुरी मिळाल्यामुळे गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश आले. तेथे अनेक कुटुंबांना स्वत:चे घर नसल्यामुळे गावातील झोपडपट्टीत कुडाच्या घरात अनेक वर्षांपासून वास्तव्य करावे लागत होते. गावठाण मंजूर नसल्यामुळे या कुटुंबांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. जागेच्या मालकी हक्काची नोंद नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागत होते.
गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे याबाबत समस्या मांडल्या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अखेर गावातील सचिन ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर स्थानिक पातळीवर पाठपुरावा केला. नंतर गावकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अखेर तहसीलदार अरुण शेलार यांनी त्यांची दखल घेऊन तलाठी, ग्रामपंचायत सचिव अहवाल, ग्रामपंचायत ठराव व इतर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वाढीव गावठाण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. त्यानंतर ३.६ हेक्टर जागेला मंजुरी देण्यात आली.
आता या जागेवर प्लॉट पाडून येथील रहिवाशांना लवकरच जागेचे लीजपट्टे वाटप केले जाणार आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी सचिन ठाकरे, सरपंच चैताली चौधरी, उपसरपंच गौतम वासनिक, ग्रामपंचायत सदस्य सुनील टेकाम तसेच वसंत कुरशिंगे, बबन राऊत, मारुती आत्राम यांच्यासह गावकऱ्यांनी पाठपुरावा केला.
नागरिकांमध्ये समाधान
गेल्या अनेक वर्षांपासून कुडाच्या घरात दिवस काढून अनेक यातना भोगलेल्या झोपडपट्टीवासीयांनी मालकीचे घर मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले. आता घरकूल, शौचालय यासारख्या वैयक्तिक शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. तसेच ग्रामपंचायत व इतर यंत्रणेतर्फे सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Leaseholders of the place to get the citizens of Dewarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.