यवतमाळात महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत; उसळली तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:38 PM2021-02-04T12:38:11+5:302021-02-04T12:38:42+5:30

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सुरू झाली असून ती बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे.

Leaving reservation for women sarpanch in Yavatmal; The repentant crowd erupted | यवतमाळात महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत; उसळली तोबा गर्दी

यवतमाळात महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत; उसळली तोबा गर्दी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सुरू झाली असून ती बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. ९८० पैकी तब्बल ५२५ गावांमध्ये महिला सरपंच होणार आहेत. या गावांची नावे जाणून घेण्यासाठी बचत भवनात गुरुवारी अक्षरश: जत्रा भरली आहे.
गावांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक महिला निवडून आल्या आहेत. यातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत. प्रथमच या महिला गावातील सरपंच पदाची धुरा हाती घेणार आहेत. यामुळे गाव विकासासाठी नवा दृष्टिकोन महिला सरपंचांकडून अवलंबिला जाईल, याचा आनंदही महिला वर्गामध्ये पाहायला मिळत आहे. महिलांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील, यामुळे गाव शिवारात कही खुशी, कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Leaving reservation for women sarpanch in Yavatmal; The repentant crowd erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच