विद्यार्थिनींना जंगलात सोडून बस परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:10 PM2019-07-31T23:10:35+5:302019-07-31T23:10:57+5:30
रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली. करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली.
करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात. बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर करंजखेडला परतण्यासाठी सर्व विद्यार्थिनी समग्र शिक्षा अभियान्याच्या एसटी बसने गावी जात होत्या. करंजखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्ता दयनीय असल्याचे कारण देत चालकाने एसटी बस पुढे नेण्यात नकार दिला. विद्यार्थिनींना जंगलात उतरून देण्यात आले. अखेर विद्यार्थिनींनी दीड किलोमीटरपर्यंत पायदळ प्रवास करून घर गाठले.
महागाव - करंजखेड या पाच किलोमीटर अंतरात रस्ता बांधकाम कंपनीच्या गौण खनिज वाहतुकीमुळे हा रस्ता कमालीचा दयनीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप पावसामुळे रस्त्यालगतचे झाड कोसळले.
त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने एसटी बस पुढे जात नव्हती. चालकाने आपल्याला विचारून हा निर्णय घेतल्याचे करंजखेडचे सरपंच प्रवीण ठाकरे यांनी सांगितले.